कुणकवळे स्वामी समर्थ मंदिराचा वर्धापन दिन, प्रकट दिन सोहळा 19 पासून!

मसुरे | झुंजार पेडणेकर : कुणकवळे येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचा पहिला वर्धापन दिन व स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा १९ ते २४ मार्च या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. स्वामी भक्तांनी या सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र, मुंबई-कुणकावळे यांनी केले आहे.

यानिमित्त रुद्राभिषेक, पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद, स्थानिक हरिभजन, २० मार्च रोजी पालखी प्रदक्षिणा, सायंकाळी महाआरती, प्रार्थना, श्रींचे पूजन, आरती, प्रार्थना रात्री मोरेश्वर फुगडी मंडळ, नेरुर वाघचौडी ग्रुपचा कार्यक्रम. या दिवशी प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी दत्तयाग यज्ञ करण्यात येणार आहे.

शनिवार, २१ रोजी देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ, इन्सुलीचा ‘तोची एक समर्थ’ हा नाट्यप्रयोग सादर होईल. २२ रोजी श्रींची पालखी ग्रामदेवता दुर्गामाता भेट, श्रींची पालखी भेट, मांड व गावात समर्थ सेवेकरी भेटीला जाणार आहेत. २३ रोजी श्रींच्या आज्ञेने श्रींची पालखी मालवण येथे समुद्रस्नानाला प्रस्थान करणार आहे. मालवण येथे वस्तीला राहून मंगळवार, २४ रोजी पहाटे ५ वाजता समुद्रस्नान करून पालखी मालवण येथून निजधामी श्री क्षेत्र कुणकवळेकडे प्रस्थान करणार आहे.उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.