श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये येथे “लॅब ऑन व्हील” उपक्रमाचा शुभारंभ

. ओटवणे (प्रतिनिधी )रीट संस्था , पुणे आणि उमेद फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनीये या प्रशालेयत लॅब ऑन व्हील या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची अभिरुची वाढावी, विधार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी या हेतूने या नाविन्यपूर्ण “लॅब ऑन व्हील” या उपक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा विभागातील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये येथे सुरू करण्यात आला.

या उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून श्री शिवप्रसाद नाटेकर यांनी विद्यार्थ्यांना शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष, पृथ्वीचे अंतरंग, मानवी कान आदी विज्ञान विषयांवरील माहिती सोप्या व रोचक पद्धतीने दिली. तसेच विज्ञान विषयाशी संबंधित विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.

हा उपक्रम दर आठवड्याला शाळेत आयोजित करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध प्रयोग प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे.

हा उपक्रम राबविण्यासाठी घारपी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. जे. डी. पाटील यांनी मोठे सहकार्य केले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जान्हवी सावंत यांनी संस्थेचे तसेच श्री. जे. डी. पाटील यांचे आभार मानले.तसेच या उपक्रमाचा लाभ घेत मुलांनी यातून काहीतरी नवनवीन शिकावं असं आवाहन केले