रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन प्रायोजित भव्य ढोल वादन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : श्री त्रिमुखी देवी उत्सव मंडळ, कोळंबे (खालचा वठार) यांच्या वतीने आयोजित आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन प्रायोजित भव्य ढोल वादन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण १३ ढोल पथकांनी सहभाग नोंदवून पारंपरिक ढोल वादन कलेचे दणदणीत सादरीकरण केले.

स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये ५०००, द्वितीय पारितोषिक रुपये ३००० आणि तृतीय पारितोषिक रुपये २००० अशी रोख रक्कम ठेवण्यात आली होती. याशिवाय सर्व सहभागी पथकांना मानाचा कप, शिल्ड आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील विजेते संघ पुढीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक : नादगर्जना ढोल पथक, वाडेकरवाडी – नाचणे
द्वितीय क्रमांक : सांब रवळनाथ ढोल पथक, चिंचखरी
तृतीय क्रमांक : शिवगर्जना ढोल पथक, नाचणे

हा कार्यक्रम रोटे. हिराकांत साळवी यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन तर्फे प्रायोजित करण्यात आला होता. क्लबच्या वतीने डॉ. संदीप करे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय केले.

कार्यक्रमाला रोटे. सीताराम सावंत, रोटे. बिपिन गांधी, रोटे. वामन सावंत, रोटे. आकांक्षा साळवी, सौ. सायली साळवी तसेच इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन* तर्फे सौ. ऋचा गांधी, सौ. श्रद्धा सावंत हे क्लबचे सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमाला हजारो प्रेक्षकांनी उपस्थित राहून ढोल वादनाचा आनंद घेतला. अनेक नागरिकांनी कलाकारांच्या उत्साहाचे कौतुक करत उत्स्फूर्तपणे रोख बक्षिसांची लयलूट केली.

पारंपरिक ढोल वादन कला जोपासणाऱ्या विविध मंडळांनी आकर्षक वेशभूषा, जोशपूर्ण सादरीकरण आणि लयबद्ध तालांनी वातावरण दणाणून सोडले.

या दणदणीत आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमामुळे परिसरात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.