वाभवे – वैभववाडी न. पं. मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन
वैभववाडी l प्रतिनिधी : वाभवे – वैभववाडी नगरपंचायत च्या वतीने थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी चार फिरती पथके नियुक्त करण्यात आली आहेत. शहरातील नागरिकांनी थकीत पाणी व घरपट्टी तात्काळ भरणा करावी असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे. संबंधीतानी कर न भरल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
थकित घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यात यावी यासाठी यापूर्वी नोटीस देण्यात आली आहे. परंतु तरीही कर भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तीन-चार वर्ष कर न भरणाऱ्यांवर जप्तीची तसेच न कनेक्शन बंद करण्याची कारवाई नगरपंचायतने सुरू केली आहे. सदर पथकाकडून घरोघरी जावून वसूली सुरु करण्यात आली आहे.










