नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचा कारभार सुरू.
सिंधुनगरी l प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी श्री प्रमोद मधुकर कामत तर उपाध्यक्षपदी श्री तुकाराम चंद्रकांत साईल उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड झाली. खासदार व माजी मुख्यमंत्री भाजप नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील या जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता पुन्हा सुरू झाली! या जिल्हा परिषदेची आता आठवी टर्म सुरू होत असून लोकनियुक्त कारभार जिल्हावासियांसाठी खुला झाला.
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची पहिली विशेष बैठक पीठासन अधिकारी अपर जिल्हाधिकारी सौ शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब उपस्थित होते. निवडीनंतर जिल्हा परिषदेचा पारदर्शक व जनसेवेसाठी गतिमान कारभार करू अशी ग्वाही अध्यक्ष व उपाद्यक्ष यांनी आपल्या भाषणात दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी जिप चे सदस्य असल्याबाबत ओळखपत्र आजच सुपूर्त करीत प्रत्येक सदस्याची ओळख करून घेतली.
भारतीय जनता पक्षाचे गटनेते श्री संजय नामदेव बोबडी, यांच्यासह श्री प्रमोद पुंडलिक रावराणे, श्रीमती श्रावणी रोहन रावराणे, श्रीमती रिद्धी रितेश सुतार, श्रीमती प्राची देवानंद इस्वलकर, श्री संतोष चंद्रकांत पारकर, श्री मनोज तुळशीदास रावराणे, श्रीमती सुप्रिया संदीप मेस्त्री, श्रीमती शितल अमित दळवी, श्री संदेश श्रीधर सावंत, श्रीमती सुयोगी रवींद्र घाडी, श्रीमती अवनी अमोल तेली, श्रीमती अनुराधा महेश नारकर, श्री देवदत्त दामोदर कदम, श्रीमती सावी गंगाराम लोके, श्री सुनील बाळकृष्ण पारकर, श्रीमती क्षमा संदीप हडकर, श्रीमती सुप्रिया संतोष वालावलकर, श्रीमती आरती हरिश्चंद्र पाटील, श्री प्रितेश शंकर राऊळ, श्रीमती शोभा गुलाबराव गावडे, श्री संदीप एकनाथ गावडे, श्री विक्रांत विकास सावंत, श्रीमती अर्पणा वसंत सातोस्कर, , श्रीमती श्वेता सूर्यकांत धर्ने , व रामा दशरथ गवस हे भाजपचे सदस्य तर शिवसेना पक्षाचे जिप गटनेते दीपक नारकर यांच्यासह सौ रुहिता राजेश तांबे, श्रीमती सोनाली सुनील घाडीगावकर, श्रीमती वर्षा मांगिरीश सांबारी, श्रीमती सुमेधा संतोष पताडे, श्री संतोष वसंत साटविलकर, श्रीमती दिपलक्ष्मी सुशांत पडते, श्री नागेश नारायण अईर, श्री केशव रमेश नारकर, श्री रुपेश रवींद्र कानडे, श्रीमती यज्ञा देवदत्त साळगावकर, श्री सुधन सोनू कवठणकर, व साक्षी विश्रांत तळवडेकर हे १३ शिंदे शिवसेना सदस्य व अपक्ष म्हणून निवडून आलेल्या वायरी भूतनाथ येथील सदस्या श्रीमती अक्षता राजन गावडे या गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषद विकास आघाडी” असा अपक्ष व उबाठा विरोधी पक्षाचे गटनेते नितीन राऊळ यांच्यासह राजन चिके मायकल डिसोजा , रुपेश पावसकर, उबाठा शिवसेनेचे विजय नाईक,गंगाराम सडवेलकर, संजय गावडे, हेही जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.












