उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वे धावणार सुसाट

मुंबई-मडगाव दरम्यान विशेष फेऱ्यांची घोषणा

सावंतवाडी | प्रतिनिधी : उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई ते मडगाव दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १६ एप्रिल ते १२ जून २०२६ या कालावधीत मुंबई सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून या गाड्या सुटणार असून, यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यात मुंबई सीएसएमटी – मडगाव साप्ताहिक स्पेशल (०११७१/०११७२)

ही गाडी १६ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत दर गुरुवारी धावेल.

गाडी क्र. ०११७१: मुंबई सीएसएमटी येथून दर गुरुवारी मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल.

गाडी क्र. ०११७२: मडगाव येथून दर गुरुवारी सायंकाळी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

डब्यांची रचना: एकूण २२ डबे (२ टायर एसी-१, ३ टायर एसी-६, स्लीपर-९, जनरल-४ आणि एसएलआर-२).

 

तर एलटीटी – मडगाव साप्ताहिक स्पेशल (०१११९/०११२०)

ही गाडी १७ एप्रिल ते १२ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवारी धावेल.

गाडी क्र. ०१११९: लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शुक्रवारी मध्यरात्री ००:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल.

गाडी क्र. ०११२०: मडगाव येथून दर शुक्रवारी सायंकाळी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:३० वाजता एलटीटीला पोहोचेल.

डब्यांची रचना: २१ एलएचबी (LHB) डबे (फर्स्ट एसी-१, २ टायर एसी-३, ३ टायर एसी-७, स्लीपर-८ आणि जनरेटर कार-२).

‘या’ स्थानकांवर असेल थांबा

या दोन्ही विशेष गाड्या दादर (फक्त सीएसएमटी गाडीसाठी), ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या स्थानकांवर थांबतील.

बुकिंग अपडेट:

गाडी क्र. ०११७२ आणि ०११२० साठीचे बुकिंग १७ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर (PRS) आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू होईल.

प्रवाशांनी या विशेष फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘KR Mirror’ ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.