रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजीकच्या जांभूळ फाटा धार व मिरजोळे धार येथील रस्त्यावर एका कारने दुसऱ्या कारला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना शनिवार 7 मार्च रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली.
या प्रकरणी संशयित कारचालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनय रविंद्र साळवी (५०, रा. टेंभ्ये, रत्नागिरी) असे संशयित कार चालकाचे नाव आहे. खबर देणार शुभम शिवाजी सनगरे हे आपल्या ताब्यातील कार (एमएच-०८ एएक्स ०१५१) घेऊन रत्नागिरी ते मजगाव असे जात असताना जांभूळ फाटा धार व मिरजोळे धार या ठिकाणी आले असता रत्नागिरीच्या दिशेकडे येणारी कार (एमएछ-४३ सीएम ५४६८) वरिल संशयित चालक अभिनय साळवी याने शुभम सनगरे यांच्या कारला धडक दिली. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.












