कणकवली :
डिझेल चोरल्या प्रकरणी खारेपाटण येथील एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यासाठी अॅड. सौ. निकिता म्हापणकर यांनी आरोपीच्या वतीने काम पाहिले. दिनांक २१/०७/२०१९ रोजी १९.०० वा. ते २२/०७/२०१९ रोजी सकाळी ७.०० वा चे मुदतीत खारेपाटण ता. कणकवली येथे फिर्यादी चंद्रशेखर शरद शिंदे यांच्या मालकीचा ट्रक नं. एम एच १३-ए एक्स ३४४५ हा सिंधुदुर्ग बँकेच्या समोरील रस्त्यावर उभा करून ठेवलेला असताना आरोपी धनाजी आत्माराम चव्हाण याने आरोपी शांताराम रामचंद्र सुतार व प्रदीप हरिश्चंद्र मोरे यांचे मदतीने सदर ट्रकमधील डिझेल टाकीचा नट लुज करून त्यातील डिझेल प्लॅस्टिक कॅन मध्ये भरून चोरून नेले म्हणून सदर आरोपी विरुद्ध भा. दं. वि. कलम ३७९ व ३४ प्रमाणे कणकवली न्यायालयात गुन्हा दाखल करून दोषारोप दाखल करण्यात आला होता. सदर कामी सरकार पक्षातर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले. परंतु, आरोपी विरुद्ध कोणताही सबळ पुरावा मिळून न आल्याने कणकवली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब श्री. टी. एच. शेख यांनी सदर आरोपींची निर्दोष मुक्तता केली. याकामी आरोपी धनाजी चव्हाण तर्फे अॅड. सौ. निकिता म्हापणकर, आरोपी शांताराम सुतार तर्फे अॅड. श्री. भालचंद्र पाटील व आरोपी प्रदीप मोरे यांचे तर्फे अॅड. श्री. राजेश परुळेकर यांनी काम पाहिले.












