रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे आज सिंधुदुर्गात

 

कणकवली : रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

 

दौऱ्यानुसार, सायंकाळी ५.१५ वाजता मुंबईतील जुहू येथील निवासस्थानावरून खासदार राणे यांचे प्रस्थान होईल. त्यानंतर सायंकाळी ५.४५ वाजता सांताक्रूझ (पूर्व) येथील कलीना विमानतळ गेट क्रमांक ८ येथे त्यांचे आगमन होणार आहे. सायंकाळी ६.०० वाजता तेथून लिअर जेट विमानाने प्रस्थान करून सायंकाळी ७.०० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर ते पोहोचतील. चिपी विमानतळावरून सायंकाळी ७.०५ वाजता पुढे निघून सायंकाळी ७.३० वाजता कुडाळ येथील नवीन एस.टी. बस स्थानकावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर रात्री ८.३० वाजता कुडाळहून प्रस्थान करून रात्री ९.०० वाजता कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर ते दाखल होणार आहेत.