कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षस्थानी शिल्पा खोत तर उपाध्यक्ष पदी तानाजी पाटील…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: आज दुपारी कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली.यामध्ये हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली होती.आणी महायुतीतील घटक पक्षात सुरू असलेल्या स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडावा याबाबत निर्णय घेण्यात आला.

अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ जिल्हा बँक बरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद कागललाच नेले.सेनापती कापसे’ च्या जिल्हा परिषद सदस्य शिल्पा शशिकांत खोत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.आज दुपारी या नावावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिक्कामोर्फत केले.तर उपाध्यक्ष म्हणून भाजपचे मुडशिंगी जिल्हा परिषदचे सदस्य तानाजी पाटील यांची निवड झाली आहे.

तत्पूर्वी महाविकास आघाडीकडून देखील ही निवडणूक लढण्याचा निर्धार झाला होता. काँग्रेसकडून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज केला होता.मात्र आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडून मैत्री धर्म पाळत काँग्रेस उमेदवारांचे अर्ज मागे घेतल्याने महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाचे शिल्पा खोत अध्यक्ष तर भाजप’चे सदस्य तानाजी पाटील यांची जिल्हा परिषदेवर बिनविरोध निवड झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी निवड झाल्याचे जाहीर केले.