रत्नागिरी :
महाराष्ट्रातील कराडकर पठडीतील ज्येष्ठ कीर्तनकार कीर्तनाचार्य श्रीपाद रामकृष्ण ढोले बुवा यांचे मंगळवार दिनांक दहा नोव्हेंबर दिवशी रत्नागिरी येथे रात्री दुःखद निधन झाले. कीर्तनातील अनेक परंपरांपैकी कराडकर पठडी ही शैली वेगळी बांधली जाते. किर्तन सेवेतील कर्नाटकातील शृंगेरी पिठाचा पुरस्कार आणि गोवा राज्य पुरस्कार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. मृत्यू समय त्यांचे वय 89 वर्षे होते.महाराष्ट्रातील हयात असलेल्या नामवंत कीर्तनकारापैकी ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांना सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.













