जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजन
लांजा (प्रतिनिधी) जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था लांजाच्या वतीने दिनांक २८ मार्च रोजी कुलकर्णी काळे छात्रालय लांजा येथे राम रावण युद्ध नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २८ मार्च रोजी रात्री ८.०० वाजता होणार आहे.. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या मंडळाला रोख रुपये १० हजार आणि सन्मान चिन्ह, द्वितीय विजेत्यांना रुपये ७००० व सन्मान चिन्ह आणि तृतीय विजेत्यांना रुपये ३ हजार व सन्मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी जिजाऊ संस्थेचे तालुकाप्रमुख योगेश पांचाळ ८९९९६६३०७९, जिल्हाध्यक्ष ॲड महेंद्र मांडवकर ९४२३२९२५७५ यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे











