गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील जानवळे श्री संत रोहिदासवाडी येथे पालखी महोत्सवा निमित्त
सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींमध्ये
धर्मदास जानवळकर,गणेश जानवळकर,पंढरी जानवळकर
कविता जानवळकर, रमेश जानवळकर, प्रेरणा जानवळकर,श्रीम. लक्ष्मी जानवळकर ,श्रीम. कांचन जानवळकर,श्रीम. विमल जानवळकर, अशोक जानवळकर, दिपक जानवळकर, रघुनाथ जानवळकर, नामदेव जानवळकर,संतोष जानवळकर, सुरेश जानवळकर,उत्तम जानवळकर, मंगेश जानवळकर,शरद जानवळकर,रमेश जानवळकर,राजाराम जानवळकर, विष्णू जानवळकर, प्रकाश जानवळकर, सुरेश पेवेकर आदी सेवानिवृत्त झालेल्यांचा सत्कार करण्यात आला.पालखी महोत्सवाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पालखीचे घरोघरी पूजन, श्रीसत्यनारायणची वार्षिक पूजा, पालखी नाचविणे, वाडीतील कलाकारांचे विविध कलांचे सादरीकरण , ढोल वादन रेकॉर्ड डान्स, बासरी वादन, गायन, संगीत खुर्ची फनी गेम्स असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय जानवळकर, सचिव संतोष जानवळकर, उपाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर वाडीतील सर्व सदस्य, गाव व मुंबई येथील ग्रामस्थ, महिला बहसंख्येने उपस्थित होते. सेवानिवृत्तांमधून अशोक जानवळकर यांनी आपले मनोगत मांडले व या स्तुत्य उपक्रमाविषयी मंडळातील सदस्यांचे व आयोजकांचे कौतुक केले..सुत्रसंचालन दिनेश जानवळकर तर आभार सुनिल जानवळकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळातील सदस्य अशोक जानवळकर,मंगेश जानवळकर, अंकुश जानवळकर, नथुराम जानवळकर सर्वच कार्यकर्त्यांनी व तरुण मुलांनी विशेष मेहनत घेतली.












