मोडकाआगर वार्ताहर :
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे ह.भ.प.वै.डॉ. राजेंद्र (भाई) जावकर पुण्यस्मरणाप्रित्यर्थ
श्री रामकथा निरुपण कार्यक्रम जावकर निवास ,शृंगारतळी येथे गुरुवार दि.१९ मार्च ते दि.२५ मार्च या कालावधीमध्ये सायंकाळी ६ ते ९ वा. आयोजित करण्यात आला आहे. श्री राम कथा निरूपण कथाकार म्हणून ह.भ.प. सचिन महाराज साळवी असणार आहेत. रात्री ९ च्या नंतर महाप्रसाद तसेच दि. २५ मार्च २०२६ रोजी सायं. ७ ते ९ किर्तन आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जावकर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.












