‘ऑफ्रोह’च्या फलटण येथील विभागीय बैठीत उपस्थित राहावे: महिला आघाडी कार्याध्यक्षा रूक्मिणी धनी

रत्नागिरी (प्रतिनिधी)   स्थानिक पातळीचे सामाजिक प्रश्न , कर्मचा-यांचे प्रश्न व नेतृत्व कौशल्य कार्यशाळा यावर विचारमंथन करण्यासाठी महाराष्ट्रातील 6 महसूल विभागनिहाय मध्यवर्ती ठिकाणी ‘ऑफ्रोह’च्या विभागीय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

सातारा (फलटण) येथे 6ऑगष्ट 2023 रोजी होणा-या ऑफ्रोहच्या विभागीय बैठकीला अधिकाधिक पदाधिका-यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ऑफ्रोह महिला आघाडीच्या राज्य कार्याध्यक्षा रूक्मिणी धनी यांनी केले.

जिल्हा शाखांच्या विभागस्तरावर बैठका घेवून कामांचा विस्तार करणे व सर्व शाखांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी ऑगष्ट महिन्यात ह्या सहाही विभागीय बैठका घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑफ्रोह महिला आघाडीच्या राज्य कार्याध्यक्षा रूक्मिणी धनी ह्या सेवानिवृत्त कर्मचारी बळीराम भगत यांच्या सेवानिवृत्त समारंभासाठी रत्नागिरीत आल्या होत्या. यावेळी तहसिलदार कार्यालय रत्नागिरी येथील सेवानिवृत्त कर्मचारी बळीराम भगत व त्यांच्या कुटुंबियांचा ऑफ्रोहच्या वतीने रूक्मिणी धनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमती धनी यांचाही रत्नागिरी ऑफ्रोह महिला आघाडीच्या वतीने माजी उपाध्यक्ष सिंधूताई सनगाळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार करण्यात आला.

यावेळी महिला आघाडीच्या सचिव सुनंदा फुकट,सहसचिव स्वाती रोडे,प्रतिभा रोडे, सचिव किशोर रोडे,राजेश सनगाळे बळीराम भगत इत्यादि उपस्थित होते.