सोमवारी १५ डिसेंबर रोजी लांजा येथे दिव्यांग आनंद मेळाव्याचे आयोजन

लांजा ( प्रतिनिधी) दिव्यांग जनकल्याण संस्था लांजाच्या वतीने सोमवार दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.०० या वेळेत कुलकर्णी काळे छात्रालय लांजा येथे दिव्यांग आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
या दिव्यांग आनंद मेळाव्या अंतर्गत सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन ,त्यानंतर दिव्यांग सन्मान सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी मनोरंजन खेळ आणि मार्गदर्शन होणार आहे .त्याचप्रमाणे उपस्थित पाहुण्यांचे मनोगत त्यानंतर दिव्यांग दाखले आणि रेल्वे पासचे वितरण केले जाणार आहे. दुपारी दिव्यांग कलाबहर हा कार्यक्रम होणार असून त्यानंतर दिव्यांग जनकल्याण संस्थेचे उपाध्यक्ष किरण धनावडे हे दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनां संदर्भात उपस्थित दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिव्यांग जनकल्याण संस्था लांजाचे अध्यक्ष संजय सुर्वे, उपाध्यक्ष किरण धनावडे, दीपक बाईंग तसेच कार्याध्यक्ष सचिन तांबे ,सचिव मयूर जाधव, खजिनदार संतोष धुमक व सर्व सदस्य, पदाधिकारी मेहनत घेत आहेत.