राजापूर: प्रतिनिधी
कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस राजापूर येथे अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून आणि शुभेच्छांचा वर्षाव करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी आमदार निलेश राणे यांच्यासोबत रवींद्र नागरेकर, अशफाक हाजू, नंदिनी कदम, प्रकाश कुवळेकर, दीपक बेंद्रे, गुरु शिंदे, प्रेरणा नार्वेकर, उर्मिला बाकाळकर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजापूर मतदारसंघातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आमदारांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












