पक्ष संघटना वाढीसाठी काम करा, मी आपल्या पाठीशी आ. चव्हाण यांची ग्वाही
राजापूर प्रतिनिधी: राजापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड होताच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व धोपेश्वर गणातील पंचायत समिती सदस्य उभसभापती अभिजित गुरव यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हण यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. याप्रसंगी आ. चव्हाण यांनी गुरव यांना शुभेच्छा देताना भविष्यात राजापूर तालुक्यात पक्ष संघटना बांधणीसाठी काम करा मी आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली.
राजापूर तालुका पंचायत समितीवर शिवसेना भाजपा महायुतीची पुर्ण बहुमताने सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या सभापती व उपसभपती पदाच्या निवडणूकीत महायुतीकडून उपसभपतीपदी भाजपाचे अभिजित गुरव यांची बिनविरोध निवड झाली. गुरव हे धोपेश्वर पंचायत समिती गणातुन भाजपाचे सदस्य म्हणून निवडून आले आहे. यापुर्वी त्यांनी भाजपाच्या राजापूर तालुका अध्यक्षपदीही काम केले आहे. तर सध्या ते जिल्हा कार्यकारणीत जिल्हासरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
त्यांची तालुका पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड होताच भाजपाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. गुरव यांनी नुकतीच मुंबईत आ. चव्हाण यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी आ. चव्हाण यांनी गुरव यांना शुभेच्छा देताना राजापूर तालुक्यात भाजपा पक्ष संघटन अधिक बळकट करा, उपसभापतीपदाच्या माध्यमातुन तळागाळातील जनतेची कामे मार्गी लावा मी आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली.













