मसदे-वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठात २० मार्च रोजी प्रकट दिन सोहळा!       

मसुरे | झुंजार पेडणेकर    :   श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पुज्य सदगुरू श्री गावड़ेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री सदगुरू भक्त सेवा न्यास रजि. संलग्न

मसदे-वडाचापाट येथील श्री स्वामी समर्थ मठात २० मार्च रोजी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष अभिषेक सकाळी ८:१५ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुख्य मूर्तीवर आणि अक्कलकोट येथील श्रींच्या चरणपादुकांवर दुग्ध व जलाभिषेक होईल.

सकाळी ७:१५ वा: अभिषेक व पूजा विधी,

सकाळी ११:०० वा: श्रींना नैवेद्य आणि आरती,दुपारी १:०० वा: महाप्रसाद व अन्नदान वितरण,सायंकाळी ७:०० वा: दैनंदिन आरती, रात्री ८:०० वा: श्री देवी सातेरी दिंडी भजन मंडळ (वेरली, ता. मालवण) यांचा भजनाचा कार्यक्रम.

भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

मठाच्या वतीने करण्यात आले आहे.