इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला प्रारंभ

गुरुवार १९मार्च ते २८मार्च पर्यंत रंगणार सोहळा 

आचरा–अर्जुन बापर्डेकर

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे.

सकाळी मंदिरासमोर गुढीउभारण्यात आली.त्यानंतर वाजतगाजत कानविंदे यांच्या वाड्यावरुन श्रीरामाची उत्सव मुर्ती आणून मंदिरातील नंदीचौकावर प्रतिष्ठापना केल्यावर या उत्सवाला सुरुवात झाली.मंदिरात संवस्तर पंचागवाचन केले गेले.मुर्ती प्रतिष्ठापनेनंतर दुपारी रामेश्वर मंदिराला रघुपती आरतीसह प्रदक्षिणा घातली गेली सायंकाळी माखण,दुपारी आणिसायंकाळी दरबारी गायन , सायंकाळी पाच वाजता सभामंडपात पुराण वाचन,रात्रौ आठ वाजता महापूजा, मंदिरातील पुराण वाचन, रघुपती आरती,पालखी सोहळा आणि त्यानंतर किर्तन असा दैनंदिन कार्यक्रम ललितोत्सवापर्यंत चालणार आहे..दुस-या दिवसांपासून सकाळी दहा आणि सायंकाळी सहा वाजता या उत्सवात दरबारी गायनाची परंपरा सुरु होते. या उत्सवात नामांकित गायकांच्या गायनाची सुवर्णसंधी संगीत रसिकांना लाभणार आहे.

शुक्रवार 20 मार्च रोजी सकाळी दहा वाजता गायक रंगनाथ गोविंद खोत कातवण देवगड यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.सायंकाळी सहा वाजता सतार वादक सौरभ सचिन साळुंखे मिरज सांगली यांचे सतार वादन होणार आहे त्यांना तबला साथ अनुराग साळुंखे मिरज सांगली यांची लाभणार आहे .शनिवार 21 मार्च रोजी सकाळी दहा वाजता हिमवेद प्रस्तुत गायन कार्यक्रम सादर होणार आहे.गायक हिमांशू आणि वेद चव्हाण, जामसंडे यांचे गायन होणार आहे.

सायंकाळी सहा वाजता व्हायोलिन वादक उदय गोखले रत्नागिरी यांचे व्हायोलिन वादन त्यांना तबला साथ करणार आहेत प्रथमेश शहाणे ,रविवार 22 मार्च रोजी सकाळी दहा वाजता ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा प्रस्तुत स्वर यात्रा कार्यक्रम तर सायंकाळी सहा वाजता गायिका संपदा दुखंडे आचरा हिचे गायन होणार आहे. सोमवार 23 मार्च रोजी अकरा वाजता ऋग्वेद सरजोशी, विनय वझे व सहकारी यांचे गायन होणार आहे.सायंकाळी सहा वाजता राम रंगी रंगले सादर करते संगीत विशारद सौ श्रद्धा सिनकर आणि अल्फा झी सरगम चे विजेते गायक अवधूत रेगे यांचे गायन होणार आहे.मंगळवार 24 मार्च रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक गायक कलाकार ,सायंकाळी सहा वाजता शंभो शंकरा हा संगीत विशारद सौ श्रद्धा सिंनकर आणि अवधूत रेगे यांचा गायन कार्यक्रम सादर होणार आहे.बुधवार 25 मार्च रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक गायक कलाकार सायंकाळी सहा वाजता गायक पंडित श्री गिरीश संझगिरी मुंबई यांचे गायन होणार आहे .संवादिनी श्री सिद्धेश ठक्कर तबला साथ गिरीश नलावडे यांची लाभणार आहे .गुरुवार 26 मार्च रोजी राम जन्मोत्सव सोहळा राम जन्माचे किर्तन रामदासी मिलिंद बुवा कुलकर्णी सांगली यांचे होणार आहे.सायंकाळी सहा वाजता गिरीश संझगिरी यांचे सुश्राव्य गायन होणार आहे. शुक्रवार 27 मार्च रोजी सकाळी स्थानिक गायक कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता गायिका निधी घारे पुणे यांचे गायन होणार आहे .संगीत साथ सुशील गद्रे तबलावादक अभिनव जोशी पखवाज गणेश मेस्त्री तालवाद्य हर्ष बोंडाळे यांचे लाभणार आहे शनिवार 28 मार्च रोजी रात्री महापूजे नंतर भजने आणि ललित कार्यक्रम बुधवार एक एप्रिल रोजी रात्रौ कै ग दी माडगूळकर रचित आणि कै सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीत रामायण वर आधारित स्पर्धा पुरस्कार सोहळा मन हे राम रंगी रंगले हा कार्यक्रम होणार आहे.

या वर्षी उत्सवात दररोज पालखी नंतर किर्तनकार हभप रोहण भालचंद्र पुराणिक बुवा परूळे वेंगुर्ला यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. त्यांना हार्मोनियम साथ आनंद लिंगायत व तबला साथ रूग्वेद रेमणे साखरपा हे करणार आहेत.

तरी सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे देवस्थान समिती अध्यक्ष प्रदीप गोपाळराव प्रभू मिराशी सचिव संतोष मिराशी यांसह सर्व पदाधिकारी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.