प्रतिनिधी /रोहन कांबळे
पन्हाळा: तालुक्यातील सातवे येथील तलाठी हनुमंत शंकर बधडे (वय ५५) यांनी लाच घेतल्या प्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातवे (ता.पन्हाळा) येथील प्लॉट विक्री व्यवहारामध्ये क्षेत्रफळामध्ये जास्त क्षेत्रफळाची नोंद खरेदी दस्तऐवजामध्ये झाल्याने चुकीच्या फेरफार दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता.सदर दुरुस्तीच्या कामासाठी तलाठी बधडे यांनी तक्रारदाराकडे बेकायदेशीरपणे दहा हजार रुपयांची मागणी केल्याने तक्रारदाराने अँटी करप्शन रोकडे तक्रार केली होती.त्यानूसार अँटी करप्शन ब्युरो ने तपासणी केली असता लाच मागितल्याची माहिती समोर आली.आणि लाचेतील चार हजार रुपये आधीच स्वीकारल्याचे अँटि करप्शन ब्युरोच्या पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले. उर्वरित सहा हजार रुपयांची मागणी सुरू होती. तलाठी बुधडे याच्या विरोधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील, राजेंद्र सानव, हेड कॉन्स्टेबल कृष्णा पाटील यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास कोडोली पोलीस करत आहेत












