त्रिंबक येथे जल अर्पण हस्तांतरण प्रक्रिया उत्साहात!

 ▪️जलदिंडी काढून केली जनजागृती

मसुरे | झुंजार पेडणेकर :  त्रिंबक ग्रामपंचायत अंतर्गत जल जीवन योजना नळपाणी योजना त्रिंबक आरेकर वाडी येथे जल अर्पण दिवस हस्तांतरण प्रक्रिया स्वाभिमानाचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जलसंवर्धन पाणीबचत आणि स्वच्छ पाणी पुरवठ्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या महोत्सवात जलदिंडी काढून जलसंवर्धनाचा संदेश पोहोचविण्यात आला. तसेच जलदिंडीच्या माध्यमातून महिलांनी आणि ग्रामस्थांनी पाण्याचे महत्व अधोरेखित केले. यावेळी जलवंदन उपक्रमातून पाणी जपण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच जलसंकल्प शपथ घेऊन नागरिकांनी पाणी वाचविण्याचा निर्धार व्यक्त केला. सभापती सौ प्रज्ञा चव्हाण, जि प सदस्य सौ वर्षा सांबारी, ग्रामपंचायत अधिकारी सौ माधुरी कामतेकर, सरपंच किशोर त्रिंबककर, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अभियंता श्री वाळके, श्री. माने, उपसरपंच सुचिता घाडीगावकर, ग्रा सदस्य आशिष बागवे, माजी सरपंच अशोक बागवे, शेखर सुतार, राजू त्रिंबककर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, शिक्षक, महिला तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरानी मनोगत व्यक्त करताना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले. आभार सरपंच