सावंतवाडी पोलीस स्टेशन रस्त्यावर खड्डेच खड्डे

सावंतवाडी : प्रतिनीधी :  सावंतवाडी पोलीस स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. पोलीस स्टेशनच्या गेट समोरच भले मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पोलीसांसह नागरिकांनाही याचा मनस्तापशहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.