वेंगुर्ले तील किशोर सोन्सूरकर यांची ‘भारत श्री’ या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड
वेंगुर्ले : प्रतिनिधी
इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन ६६ व्या सिनियर नॅशनल मेन्स अँड उमन्स बॉडी बिल्डिंग चॅम्पियन शिप आणि ६३ व्या जुनिअर नॅशनल मास्टर्स अँड फिजिकल चॅलेंज मेन्स अँड उमन्स बॉडी बिल्डिंग चॅम्पियन शिप दिनांक २८ ते ३० मार्च २०२६ या कालावधीत पिंपरी चिंचवड पुणे येथे आयोजित केली आहे. या मानाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग मधून वेंगुर्ले येथील आंतर राष्ट्रीय बॉडी बिल्डर आणि पंच दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली चे मुख्याध्यपक आणि सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर अससोसिएशन सचिव श्री किशोर शांताराम सोनसूरकर सर यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. आई बी बी एफ एफ, एएफ बी एफ, आई एफ बी बी चे जनरल सेक्रेटरी मा. डॉक्टर श्री संजय मोरे सर यांनी सदर निवड केली.
सिंधुदुर्ग मध्ये व्ययाम प्रसार अभियान तसेच स्वतः बॉडी बिल्डिंग खेळाडू ते पंच असे
गेली चाळीस वर्ष व्यायाम क्षेत्रात त्यांचे कार्य सुरु आहे. त्यांनी आज पर्यंत विविध जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून यशस्वी कामगिरी पार पाडली आहे.













