रस्त्यालाही धोका :त्वरित उपाययोजना करा
शिवसेना विभाग प्रमुख प्रशांत कोरगावकर यांची मागणी
सातार्डा । प्रतिनिधी : तळवणे वेळवेवाडी पुलाच्या भरावाची माती खचल्याने रस्त्याला धोका निर्माण झाला आहे शिवाय येथे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे विभागप्रमुख प्रशांत कोरगावकर यांनी दिली असून प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तळवणे वेळवेवाडी पुल अलीकडेच नव्याने बांधण्यात आले आहे. या पुलासाठी ग्रामस्थांनी सतत पाठपुरावा प्रसंगी आंदोलन केले. मात्र, अलिकडे पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुलाच्या प्रारंभीच्या भागात घातलेला मातीचा भराव खचल्याने येथे अपघाताची भिती निर्माण झाली आहे. शिवाय हा भराव खचल्याने रस्त्याला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच याकडे प्रशासनाने लक्ष वेधून डागडुजी करावी, अशी मागणीही श्री. कोरगावकर यांनी केली आहे .












