ग्रामपंचायत मजगांव रत्नागिरी उपसरपंच पदी शरीफ इब्जी विराजमान

 

ग्रामपंचायत मजगांव येथील सर्व सदस्य गांवात विकासासाठी अहोरात्र मेहनत करणारे शिवसेनेच्या माध्यमातून गांवातील प्रत्येक समस्या सोडवणारा सरपंच फय्याज मुकादम , शिवसेना पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ आणि मित्रमंडळी यांच्या विश्वासाने शरीफहसन महमूद इब्जी यांची मजगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नियुक्ती करण्यात आली.

त्यांच्या नियुक्ती मुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या वेळी शरीफहसन इब्जी यांनी सांगितले की जनतेने आपल्या वर जो विश्वास दाखविला आहे. त्याला तडा जाऊ देणार नाही. आणि मजगांवच्या विकासासाठी आपण जातीने मेहनत करु.