खा. नारायणराव राणे यांच्या वाढदिवसा निमित्त राजापुरात १० ते १३ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

खा. राणे यांच्या उपस्थितीत ११ रोजी अभिष्टचिंतन मेळावा
७५ वर्षीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ७५ व्यक्तींचा होणार खा. राणे यांच्या हस्ते सन्मान
रविदादा सहयोगी मित्र मंडळ व एन. आर. प्रतिष्ठानचा उपक्रम

राजापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त रविदादा सहयोगी मित्र मंडळ व एन. आर. प्रतिष्ठान राजापूर यांच्या वतीने १० एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वाढदिवसानिमित्त शनिवारी ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या खा. राणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा मेळाव्याला खा. नारायण राणे उपस्थित रहाणार असून यावेळी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तालुक्यातील ७५ वर्षीय वयाच्या ७५ व्यक्तींचा खा. राणे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार नारायण राणे यांचा १० एप्रिल रोजी वाढदिवस साजरा होत आहे. खा. राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातही विविध कार्यक्रम होत आहेत. राजापुरात निमित्त रविदादा सहयोगी मित्र मंळ व एन. आर. प्रतिष्ठान राजापूर यांच्या वतीने १० एप्रिल ते १३ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी १० एप्रिल रोजी खा. राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर ग्रामीण रूग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता या रक्तदान शिबिराचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा संघटक व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी तालुका पंचायत समिती सभापती नंदीनी कदम यांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच राजापूर नगर परिषदेचे शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित रहाणार आहेत.
शनिवारी ११ एप्रिल रोजी खा. राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील यशोदिन सृष्टी सभागृह (पाटील मळा) या ठिकाणी सकाळी १०.३० वाजता हा मेळावा होणार आहे. याप्रसंगी खा. राणे हे उपस्थित रहाणार असून यावेळी राजापूर वासीयांच्या वतीने खा. राणे यांचा भव्य सन्मान करून व केक कापून वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी राजापूरचे आमदार किरण सामंत, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे हे उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्यात राजापूर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व वयाची ७५ पुर्ण केलेल्या ७५ व्यक्तींचा खा. राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
रविवारी १२ एप्रिल रोजी जिल्हास्तरिय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राजापूर हायस्कुलच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता हा स्पर्धा होणार असून याचा शुभारंभ राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या पालखी नृत्य स्पर्धेचे व्यवस्थापन व नियोजन हे राजापूर प्रतिष्ठान राजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
सोमवारी १३ एप्रिल रोजी ओणी येथील बालकाश्रमातील मुलांना खाऊ वाटप केले जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार असून याप्रसंगी ओणी विभागाचे जि. प. सदस्य प्रतिक मटकर यांसह जि. प. सदस्य प्रकाश कुवळेकर, रमेश सुद आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांना सगळयांनी उपस्थित रहावे असे आवाहन रविदादा सहयोगी मित्र मंळ व एन. आर. प्रतिष्ठान राजापूरचे रवींद्र नागरेकर व सहकारी तसेच शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी यांनी केले आहे.