लांजा ( प्रतिनिधी): उर्मिला माने विद्यालय आसगे च्या शैक्षणिक मदतीसाठी रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता, गणेश कला रंगमंच, स्वारगेट पुणे येथे बहुरंगी नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तालुक्यातील आसगे येथील उर्मिला माने विद्यालयाच्या शैक्षणिक मदतीसाठी प्रशालेचे माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील हितचिंचक आणि शिक्षण प्रेमी पुणे शहर यांच्यावतीने कोकणातील या लोकप्रिय बहुरंगी नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हे नमन नवयुग सेवा नमन मंडळ आसगे मांडवकरवाडी यांच्या वतीने सादर केले जाणार आहे.
यासाठी शंभर रुपये तिकीट दर आकारण्यात आला असून त्या इच्छुकांनी नारायण धावडे९८६०१२९६०२,तानाजी बंडबे ८२६१९१२२३२, रामभाऊ बडबे ८४८४९३९३८०, सुरेश मांडवकर ८०८०११३६५६, काशिनाथ मांडवकर,९३०७१४३६६०, भाई टोळे ९९७०८६९९९०, शांताराम शितप. ९५८२९९२१४७ अंबाजी मांडवकर ९८९०९८५६९७ यांच्याशी संपर्क साधायचा आहे.













