धुंदरे नामयेवाडी येथे शनिवारी ४एप्रिल रोजी संत निरंकारी आध्यात्मिक सस्तन सोहळा

लांजा (प्रतिनिधी) :लांजा शहरा नजीकच्या धुंदरे नामयेवाडी येथे शनिवार दिनांक ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० ते रात्री ९.०० या वेळेत संत निरंकारी अध्यात्मिक सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
या सत्संग सोहळ्याला नाशिक येथील केंद्रीय ज्ञान प्रचारक गुलाब पंजवानीजी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे .‌ धुंदरे नामयेवाडी आसगे रोड येथील प्रकाश नामये यांच्या इथे हा कार्यक्रम होणार आहे.‌ तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक युनिट प्रकाश रसाळ, लांजा मुखी चंद्रशेखर बेंडकळे यांनी केले आहे.