‘शिवालय शास्त्री’मधून घडणार सशक्त बालवक्ते
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरळ वाचनालयात ‘वाचन प्रचारक-वाचन दूत’ उपक्रमांतर्गत शिवालय शास्त्री हा बालवक्ते घडवण्याच्या उपक्रमाचा नुकताच शुभारंभकरण्यात आला वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या विशेष ज्ञान प्रचार वळणावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचन लेखनाची गोडी लागावी म्हणून हा अभिनव कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला असून या माध्यमातून सशक्त बालवक्ते निर्माण होण्यास मदत होणार आहे.
दशक्रोशीतील २४ मराठी शाळा कार्यक्षेत्रातील शिरळ मराठी शाळा ने.१ आणि अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांनी अष्टकोनी शिवालय शास्त्री सादरीकरणात सहभाग घेतला. परी घडशी, आरोही कदम, प्रीती घडशी, ऋग्वेद केळकर यांनी वक्तृत्वातून आपली मते मांडली. हत्वि घडशी, श्रेया भुवड यांनी सादर कलेल्या कथांनी लक्ष वेधले. शिरळ वाचनालयाच्या अभ्यासिकेतील अनन्या शिरकरने दासबोध द्वितीय परीक्षेत विशेष यश संपादन केल्याने तिचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत शिरळ मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या २२ कलाकृतींपैकी ४ कलाकृतींची निवड मिरजोळी हायस्कूलचे कलाशिक्षक मते यांनी केली. या छायाचित्रांचे प्रदर्शन वाचनालयात मांडण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या सायली वाजे, प्रमोद जोशी, नंदकिशोर लेले, दत्तात्रय भिडे, खेर्डी वाचनालयाचे अध्यक्ष अशोक निर्मळ, डॉ. अशोक केतकर, डॉ. किरण साठे, डॉ. रत्नाकर थत्ते, प्रकाश माने, शिरळ वाचनालयाचे अध्यक्ष गुरुप्रसाद सोवनी, उपाध्यक्ष गौरी साठें-जोशी, मुख्याध्यापिका नीलम पुरोहित, मुख्याध्यापक रोहित जाधव, सुनील लकडे, वर्षा घडशी, सृष्टी भुवड, अरुणा मेस्त्री आदी उपस्थित होते.
यानिमित्त परशुराम येथील विनय गणपुले यांनी संस्थेस ध्वनीवर्धक भेट दिला, यासाठी वैदेही निकम, ग्रंथपाल सुप्रिया खोत, कार्यकर्ते अनिल घडशी, बापू काणे, मंगेश बापट, भरत मोहिते, समीर कोवळे, कैसर देसाई आदींनी सहकार्य केले. संस्थापक गिरीधर साठे यांनी आभार मानले.
शिवालय शास्त्री हा उपक्रम शिरळ दशक्रोशीतच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण स्तरावर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण कौशल्य विकास साख्य करण्यासाठी सक्षम असल्याचे गौरवोद्गार प्रमुख पाहुणे पद्माकर बोंडाळे यांनी काढले.













