हनुमान जन्मोत्सव निमित्त वेंगुर्लेत दहा हजार जोर बैठक अभिषेक संकल्प हनुमान चरणी पूर्ण…

व्ययामपटू, भाविक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग : यंदाचे हे २७ वे वर्ष

वेंगुर्ले : दाजी नाईक
बजरंग बली की जय…जय हनुमान….जय श्री राम असा जयघोष करीत वेंगुर्ला येथील निसर्गरम्य श्री विरासन हनुमान मंदिर गाडी अड्डा वेंगुर्ला येथे व्ययाम प्रसार अभियान व्यसन मुक्त अभियान अंतर्गत गाडीअड्डा मित्र मंडळ, विरासन हनुमान मंदिर व्यवस्थापन,श्री सातेरी व्ययाम शाळा वेंगुर्ला, युवक शरीरसौष्ठव संवर्धन संस्था वेंगुर्ला, ग्रामस्थ आणि भाविक यांच्या संयुक्त विद्यमाने व्ययामपटू आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू श्री किशोर शांताराम सोन्सूरकर यांच्या मार्गदर्शन खाली उत्साहात पहाटे सहा ते आठ या वेळेत शक्ती देवता हनुमान चरणी एकत्रित दहा हजार जोर बैठक अभिषेक संकल्प पूर्ण करण्यात आला. यंदाचे हे या उपक्रमाचे २७ व वर्ष आहे.

दरवर्षी प्रमाणे आज गाडीअड्डा येथील टेकडीवर असलेल्या श्री. हनुमान मंदिर परिसरात हनुमान जन्मोत्सव निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक आरोग्य कडे लक्ष द्यावे व शरीर मजबूत निरोगी बनवावे व सोबत व्यसन मुक्ती चा संदेश यावेळी देण्यात आला. सर्व प्रथम परंपरिक आरती करण्यात आली. नंतर जोर बैठक अभिषेक ला सुरुवात झाली. या वेळी वेंगुर्ला येथील वेंगा बॉईज चे सदस्य व व्ययामपटू ग्रामस्थ यांनी सुरुवात केली. श्री. किशोर सोन्सूरकर सर यांनी उपस्तित भाविकांना व्ययामा चे महत्व सांगून वॉर्मअप करून जोर बैठक कश्या मराव्यात या बाबत मार्गदर्शन केले.

प्रत्येक व्ययामपटू ने, भाविकांनी एक तासात थांबून थांबून आपल्याला जमतील तसे जोर बैठक काढायचे आहेत व तशी नोंद करावी या प्रमाणे सर्वांनी गटागटा ने जोर बैठक काढलेत. या वर्षी पुरुष सोबत महिला यांची ही उपस्तिती उल्लेखनीय होती. ज्येष्ठ पत्रकार श्री शेखर सामंत, डॉ. राजेश्वर उबाळे, डॉ. किशोर धोंड, डॉ. वंदन वेंगुर्लेकर, रोटरी अध्यक्ष श्री आनंद बोवलेकरं, माझा वेंगुर्ला श्री राजन गावडे, श्री वसंत तांडेल, पत्रकार श्री सुरेश कौलगेकर, श्री बाळा फोवकांडे, श्री कोरगावकर, श्री मयेकर, श्री नागेश केलजी, श्री सुहास मांजरेकर, श्री केलजी मामा, श्री नित्यानंद आठलेकरं, जेस्ट व्ययामपटू श्री महेश वेंगुर्लेकर, श्री प्रकाश प्रभुखानोलकर, श्री शिवदत्त सावंत, सौ पूनम बोवलेकर, सौ संगीता कामत, प्रसाद जाधव सर, सौ शिल्पा सापळे, मंडळ कार्यकर्ते पदाधिकारी आदी मान्यवर उपस्तित होते.