तुळस श्री देव जैतिराश्रित संस्था, आणि श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस चे आयोजन
वेंगुर्ले | प्रतिनिधी : वाचनालय उपक्रमा अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने तुळस गावातील वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ग्रामस्थांचा अभिष्टचिंतन आणि सन्मान सोहळा रविवार दि. २५ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० वा. तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्थेचे संस्थापक कर्मयोगी कै. रामचंद्र य. तुळसकर सभागृह (श्री शिवाजी हायस्कूल, तुळस) येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्ल्याचे रा.पा.जोशी असून प्रमुख उपस्थिती म्हणून माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर ,सामाजिक कार्यकर्त्या वर्षा संतोष परब, जैतिराश्रीत संस्थचे अध्यक्ष ॲड प्रभानंद सावंत,वाचनालय अध्यक्ष सगुण माळकर हे उपस्थित राहणार आहेत.
तुळस गावातील सर्व ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचा शाल,श्रीफळ आणि सामाजिक कार्यकर्त्या वर्षा परब यांच्याकडून ब्लँकेट देऊन गौरविण्यात येणार आहे,तरी या कार्यक्रमास उस्थितीत रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.