५ एप्रिल रोजी खेड तालुका शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक

खेड (प्रतिनिधी) : शिवसेना खेड तालुका संघटनेच्या वतीने रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता भरणे नाका येथील जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेच्या बळकटीकरणासह आगामी राजकीय रणनीतीच्या दृष्टीने ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीस तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बूथप्रमुख, गटप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, उपतालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना तसेच अल्पसंख्याक व अल्पसंघटनांचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रश्न, संघटनात्मक घडामोडी आणि आगामी निवडणुकांची तयारी यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा. ना. योगेशदादा कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासह मा. श्री. संजय कदम, मा. श्री. अनिल नवगणे (रायगड लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख), मा. श्री. शशिकांत चव्हाण (जिल्हाप्रमुख रत्नागिरी), मा. श्री. आण्णा कदम (माजी बांधकाम सभापती, जि. प. रत्नागिरी), मा. श्री. आफिया पालेकर (सभापती, पंचायत समिती खेड), मा. सौ. माधवी बुटाला (नगराध्यक्ष, खेड), मा. श्री. सुनील मोरे (उपसभापती, पंचायत समिती खेड) आणि मा. श्री. पप्पूशेट चिवणे (उपनगराध्यक्ष, नगरपालिक खेड) हे मान्यवर उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
संघटनेची ताकद वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असून, सर्व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका प्रमुख सचिन धाडवे, शहर प्रमुख कुंदन सातपुते आणि तालुका प्रमुख अरविंद चव्हाण यांनी केले आहे.