देवरूख पंचायत समितीचा लिपिक हर्षल गवंडी पोलीसांच्या ताब्यात
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संगणक वर्गासाठी जाणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांच्यासमोर अश्लील हावभाव करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. हर्षल सुभाष गवंडी (वय २६, रा. पाटगाव. ता. संगमेश्वर) असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो संगमेश्वर पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याने केलेल्या या निंदाजनक कृत्याबद्दल तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:३० ते १०:०० च्या दरम्यान ही घटना घडली. पीडित विद्या…












