सिंधू रत्न टॅलेंट सर्च (एसटीएस) परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर

गुणवंत विद्यार्थ्यांना ईस्त्रो सफर व गोवा सायन्स सेंटर भेटीची संधी

कणकवली / प्रतिनिधी :
युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या सिंधू रत्न टॅलेंट सर्च (एसटीएस) परीक्षेची गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. सिंधूरत्न प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्या हस्ते लॅपटॉपवरील बटण दाबून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, संजना सावंत, एसटीएस परीक्षा प्रमुख सुशांत मर्गज, प्रशांत बोभाटे तसेच शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

इयत्ता चौथी, सहावी व सातवीमधील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ईस्त्रो सफर घडविण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दुसरी व तिसरीतील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना गोवा सायन्स सेंटरला भेट दिली जाणार आहे. दोन्ही जिल्ह्यांमधून एकूण ३० विद्यार्थ्यांना ईस्त्रो सफर, तर २० विद्यार्थ्यांना गोवा सायन्स सेंटर भेट दिली जाणार आहे.

याशिवाय जिल्हा गुणवत्ता यादीतील प्रत्येक इयत्तेतील ५० विद्यार्थ्यांप्रमाणे एकूण २५० विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

ईस्त्रो सफारीसाठी निवड झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी :

इयत्ता ४ थी :
शर्विल आनंदा वरुटे (नेरुर), ज्ञानदा नितीन पाटील (तळेरे), आराध्य बापू खरात (शिरगाव), श्रेयन दयानंद गावकर (दिगवळे), अखिलेश विजय घोरपडे (कणकवली).

इयत्ता ६ वी :
अर्णव राजाराम भिसे (फोंडाघाट), दूर्वा रवींद्र प्रभू (कुडाळ), वीरा राजीव घाडी (सावंतवाडी), सान्वी विष्णू कुबल (आचरा), स्वरदा अरविंद झेंडे (वजराट)

इयत्ता ७ वी :
वेदा प्रवीण राऊळ (सावंतवाडी), पूर्वा गजानन राणे (हिंदळे), रुद्र रामचंद्र पिकुळकर (सांगेली), प्रारब्ध पृथ्वीराज बर्डे (कुडाळ), अवनी रामनाथ बावकर (सावंतवाडी)