खास. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन…

“संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६” अंतर्गत भाजप सिंधुदुर्ग चे आयोजन

वेंगुर्ले : प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ११ व १२ एप्रिल रोजी “संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६” अंतर्गत भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने तसेच जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वेंगुर्ले येथे ही स्पर्धा खुल्या भव्य प्रकाशझोतात खेळविण्यात येणार असून, खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेचे आयोजन ११ व १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता करण्यात आले असून, ठिकाण कॅम्प मैदान, वेंगुर्ला असे निश्चित करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ₹२०,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹१०,०००, तृतीय क्रमांकासाठी ₹५,००० आणि चतुर्थ क्रमांकासाठी ₹५,००० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट स्मॅशर, उत्कृष्ट सेंटर, उत्कृष्ट लिबेरो आणि ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ यांसारख्या वैयक्तिक पारितोषिकांचाही समावेश आहे. प्रत्येक सहभागी खेळाडूस मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रणव वायंगणकर ९४०५७२७०६९/ ९३०९५४२२१८, संदीप : ९००४८५५६१५, सॅमसन : ९३०७३८६६५१, हेमंत गावडे : ९४२१२३५१२८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.