Update : हातखंबा शाळेजवळ पुन्हा गॅस टँकरचा अपघात – ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलन

 

रत्नागिरी – सोमवारी सकाळी हातखंबा शाळेजवळ पुन्हा एकदा गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. रस्ता सोडून हा टँकर थेट एका छोट्या टपरीत घुसला. यामध्ये दोन ते तीन दुचाकींना धडक बसली.

अपघाताच्या वेळेस शाळेची मधली सुट्टी झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. दररोज जवळपास ५० विद्यार्थी वडापावच्या टपरीवर येत असतात. सुदैवाने आज विद्यार्थ्यांना बाहेर पाठवले गेले नव्हते, त्यामुळे मोठा जीवितहानीचा धोका टळला.

 

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ आणि पालकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांतील हा दुसरा अपघात असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

 

दरम्यान, निवळी येथेही एक टँकर कलंडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने टँकर वाहतुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.