तळेबाजार येथील घटना
देवगड : प्रतिनिधी
माती टाकण्याचे काम करीत असताना विजापूर येथील कामगार रानू पांगरू पांढरे(४८) सध्या रा.तळेबाजार साईनगर हा चक्कर येवून पडल्याने देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.ही घटना २ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा.सुमारास तळेबाजार साईनगर येथील गोqवद लाड यांच्या कंपाऊंडमध्ये घडली.देवगड पोलिस स्थानकात याबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मयत रानू पांगरू पांढरे हा त्याचा मुलगा गणेश याच्यासमवेत तळेबाजार साईनगर येथे गोqवद लाड यांच्या कंपाऊंडमध्ये माती टाकण्याचे काम करीत होते.गुरूवारी सायंकाळी ५ वा.सुमारास माती टाकत असतानाच ते चक्कर येवून पडले.त्यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी तपासल्यानंतर ते मयत झाल्याचे जाहीर केले.याबाबत देवगड पोलिस स्थानकात गणेश रानू पांढरे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.तपास पो.हे.कॉ.महेंद्र महाडिक करीत आहेत.









