रत्नागिरी:
बदलते फॅशन ट्रेंड्स, नवनवीन डिझाईन्स आणि ग्राहकांची आवड यांचा अचूक वेध घेत, ज्वेलरी आणि ड्रेस मटेरियल्स क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या ‘शृंगार कलेक्शन’च्या नव्या दालनाचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. २ एप्रिल रोजी सौ. स्वरूपा रवींद्र सामंत यांच्या शुभहस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
गेली अनेक वर्षे या व्यवसायात असलेल्या श्रद्धा महेश सामंत यांच्या जिद्दीचे आणि प्रगतीचे सौ. स्वरूपा सामंत यांनी कौतुक केले, “श्रद्धा, तुझ्या व्यवसायाची वाटचाल मी पाहिली आहे. तुझ्या क्षेत्रातील तुझी प्रगती पाहून खरोखर आनंद वाटतो.” अशी शाबासकी त्यांनी दिली.
केवळ रत्नागिरीपुरते मर्यादित न राहता ‘शृंगार कलेक्शन’ने आपली झेप सातासमुद्रापार नेली आहे. आज श्रीलंका, युएस (US) आणि युके (UK) यांसारख्या देशांतूनही येथील उत्पादनांना मोठी मागणी आहे. ऑनलाईन डिलिव्हरीच्या माध्यमातून जगभरातील ग्राहकांना हाय-क्वालिटी आणि लेटेस्ट व्हरायटी पुरवण्यात हे दालन अग्रेसर ठरले आहे.
या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरीतील राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरीच्या प्रथम नागरिक शिल्पाताई सुर्वे, सौ. वर्षा किरण सामंत, श्री. सुदेश मयेकर, नगरसेवक श्री. बाळू साळवी, श्री. विजय खेडेकर . निमेश नायर, श्री. सौरभ मालुष्टे, श्री. नेताजी पाटील, श्री. प्रवीण पवार, श्री. स्वप्नील मयेकर, विभाग प्रमुख श्री. मनोज साळवी. नगरसेविका व महिला प्रतिनिधी यांच्यामध्ये सौ. प्रीती सुर्वे, सौ. श्रद्धा हळदणकर, सौ. पूजा पवार, सौ. वैभवी खेडेकर, सौ. मेधा कुलकर्णी, सौ. सायली पाटील, सौ. जागृती पिलणकर, सौ. कांचन नागवेकर, सौ. साक्षी कुमठेकर, सौ. संस्कृती पाचकुडे त्यासह राजू कीर, श्री. गणेश धुरी, श्री. विकी जैन, श्री. ओंकार भाटकर, श्री. आनंद फडके, श्री. चंदन खानविलकर, हॉटेल गोपाळचे मालक लाल्यादादा खातू, आणि मान्यवर सी.ए. व टॅक्स कन्सल्टंट्स यांचा समवेश होता.
यावेळी ना. डॉ. उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयातील सर्व सहकारी, पत्रकार मित्र, खेड आणि शिरोड्याहून आलेले खास मित्रपरिवार आणि व्यवसायाच्या सुरुवातीपासून पाठीशी उभे राहणारे श्री. जयू भाटकर यांची उपस्थिती लक्षणीय होती.
आपल्या यशाचे श्रेय सासूबाई, आई आणि पती महेश सामंत यांच्या पाठिंब्याला देत, श्रद्धा सामंत यांनी सर्व रत्नागिरीकरांना या नव्या दालनाला भेट देण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. दर्जेदार ज्वेलरी आणि लेटेस्ट ड्रेस मटेरियल्ससाठी ‘शृंगार कलेक्शन’ हे आता फॅशन प्रेमींचे हक्काचे ठिकाण बनले आहे.












