जान्हवी जाधव हिचे दंत वैद्यकीय परीक्षेत सुयश

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण पालिकेचे अधिकारी राजेंद्र जाधव व अडरे ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी रेणुका जाधव यांची सुकन्या कु. जान्हवी हिने दंत वैद्यकीय परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.
या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. खेडमधील योगिता डेंटल कॉलेजमधून तिने आपले शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. अनेकांनी पाग बौद्धकॉलनी येथील निवासस्थानी जाऊन तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.