चिपळूण खेंड बावशेवाडीच्या समृद्धी कांबळे यांचे आकस्मिक निधन

चिपळूण (वार्ताहर) : शहरातील खेंड बावशेवाडी बौद्धवाडी नं. १ येथील समृद्धी सुमेध कांबळे यांचे मंगळवार दि. १४ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता डेरवण हॉस्पिटल येथे आकस्मिक निधन झाले. त्या ३५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
समृद्धी कांबळे यांचे मूळगाव कालुस्ते असून त्यांचे शिक्षण मुंबई येथे झाले. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि सर्वांना आपुलकीने वागवणाऱ्या होता. त्यांचे पती सुमेध कांबळे हे चिपळूण नगरपालिकेत कामाला असून त्यांना दोन लहान मुले रुद्र आणि रेहा, आई, सासू, मेव्हणा, मेहुणी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे. समृद्धी यांच्या निधनाचे वृत्त समजातच नातेवाईक, मित्र परिवार आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. लहान मुलांवर आलेला हा आघात आणि कुटुंबावर ओढावलेले दु:ख पाहून सर्वांनाच गहिवरून आले. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. समृद्धी यांचा हसरा चेहरा, मदतीचा हात आणि सर्वांना एकत्र ठेवणारा स्वभाव कायम स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यांचा अंत्यविधी दि. १५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता पार पडला. तर श्रद्धांजलीचा कार्यक्रम दि. २६ जुलै रोजी त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे.