चौके | वार्ताहर : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. चौके शाखा येथील एटीएम शुभारंभ सोहळा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते गुरुवार ३ ऑगस्ट सायंकाळी ४ वाजता जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.यावेळी बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक व्हिक्टर डांटस, संचालक संदीप (बाबा) परब, संचालक मेघनाद धुरी, संचालक आदींची उपस्थिती असणार आहे.या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले आहे.












