सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाची रायगड किल्यावर यशस्वी ट्रेक

मालवण | प्रतिनिधी : सह्याद्रीच्या कुशीतील, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक रायगड किल्याची ट्रेक स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभाग 29 विद्यार्थी व विद्यार्थिनी लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम आर खोत यांच्या मार्गदर्शनात यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या एनसीसी राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत अनेक साहसी आणि संरक्षणात्मक उपक्रम राबविले जातात. त्यातीलच हा एक ट्रेकिंग कॅम्प आयोजित करण्यात आला. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंग कॅप आयोजित करण्यात येतात. यावर्षी ट्रेकिंग साठी छत्रपती शिवरायांची राजधानी असलेला रायगड या गडावर ट्रेकिंग आयोजित केलेले होते. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना शिस्त आणि कठोर परिश्रम करण्याची सवय लागावी त्याचबरोबर सदृढ आरोग्य लाभावे. अडी अडचणीवर मात करता यावी. युद्धासारख्या परिस्थितीला दोन हात करता यावे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून अशा प्रकारचे ट्रेकिंग आयोजित केले जातात. त्याचबरोबर अनेक प्रकारचे एडवेंचर कॅप आयोजित केले जातात. छत्रपती शिवरायांच्या रायगडवर आयोजित ट्रेकिंग कॅम्प सकाळी दहा वाजता सुरु झाला. दोन तासांमध्ये विद्यार्थ्यांनी रायगड ट्रेक पूर्ण केला. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले पुष्प हार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि किल्ल्याची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. दुपारी एका तासामध्ये एनसीसी विद्यार्थी गड उतरले.

कोणत्याही परिस्थितीला दोन हात करता यावे यासाठी ऊन पाऊस वारा त्याची कदर न करता कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अशा प्रकारचा कॅम्प एनसीसी विभागामार्फत आयोजित करण्यात येतात

29 विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झालेले होते या ट्रेकिंग कॅम्पचे आयोजन व नियोजन लेफ्टनंट प्राध्यापक डॉ.एम आर खोत यांनी केले. या नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे म्हणजे एनसीसी विद्यार्थी सीनियर्स प्रसाद बागवे, कुणाल वेंगुर्लेकर गौरव चव्हाण राज लाड, साहिल मीर इशा दुखंडे प्रगती भांडे, नियती पारकर हे आहेत. त्यांनी सर्व कॅम्पची पूर्वतयारी केली. त्याचबरोबर कॅम्प दरम्यान लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली. मुलींच्या दक्षतेसाठी केअर टेकर म्हणून प्राध्यापिका अन्वेषा कदम सहभागी होत्या.

एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत, कॉलेजचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते व संस्था पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.