शासकीय विश्रामगृहाच्या नुतनीकरण केलेल्या कामाचे आ. किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

राजापूर प्रतिनिधी: शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या राजापुरातील शासकीय विश्रामगृहाच्या नुतनीकरण केलेल्या विश्रामगृहाचे उद्घाटन सोमवारी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते झाले.
राजापुरातील जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले आहे. या इमारतीत एक अद्ययावत सुट तसेच कॉन्फरन्स हॉल व बैठक व्यवस्था अशी सुविधा करण्यात आली आहे. आ. किरण सामंत यांनी जातीनिशी लक्ष घालुन हे नुतनीकरण करून घेतले आहे. यामुळे आता या ठिकाणी अधिकारी बैठका घेणेही शक्य होणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी सभापती नंदीनी कदम यांसह सर्व पंचायत समिती सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, पोलीस निरीक्षक अमित यादव, नायब तहसीलदार विलास सरफरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. कांबळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता संतोष भालेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रशांत पोवार, शिवसेना विधानसभा प्रमुख राजू कुरूप, रवींद्र नागरेकर, तालुका प्रमुख दिपक नागले, यांसह सर्व अधिकारी, राजापूर नगर परिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.