पाणी टंचाई काळात पाणीपुरवठयाबाबत सुयोग्य नियोजन करा

पावसाळयापुर्वीच्या उपायोजनांची कामे प्राधान्याने पुर्ण करा
आमदार किरण सामंत यांच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांना सुचना

राजापूर प्रतिनिधी: राजापूर शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाई काळात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईबाबत तात्काळ उपाययोजना करा. तसेच पावसाळयापुर्वी करावयाच्या उपाययोजनांची सर्व कामे प्राधान्याने पुर्ण करा अशा सुचना सोमवारी आमदार किरण सामंत यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
राजापुरात सोमवारी आ. किरण सामंत यांनी सर्व प्रशासकिय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आ. सामंत यांनी विविध विभागांच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी शहरासह ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांची कामे व पाणीपुरवठा याबाबत माहिती घेतली. नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांच्याकडे त्यांनी शहरातील पाणीपुरवठयाबाबत माहिती घेतली. शहरात पाणीपुरवठा योजनेचे सुरू असलेले कामाबाबतही त्यांनी माहिती घेतली. तर ग्रामीण भागातील पाणीपुरठा योजना व सद्य स्थितीबाबत आ. सामंत यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रशांत पोवार यांच्याकडून विस्तृत माहिती घेतली. अपुर्ण योजना पुर्ण करण्याबाबत सुचना देताना त्यांनी टंचाई काळात योग्य प्रकारे पाण्याचे नियोजन करा अशा सुचना केल्या.
तर पावसाळयाच्या दृष्टीने विविध विभागांनी करावयाची कामे व उपाययोजना वेळेत पुर्ण करा, जनतेची गैरसोय होणार नाही, आपत्ती काळात योग्य पध्दतीने सामोरे जाता येईल याबा बत योग्य नियोजन करा अशा सुचना त्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला पोलीस निरीक्षक अमित यादव, नायब तहसीलदार विलास सरफरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. कांबळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता संतोष भालेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रशांत पोवार आदी उपस्थित होते.