खेडमध्ये भाजपचा स्थापना दिन उत्साहात साजरा

खेड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त खेड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ६ एप्रिल १९८० रोजी स्थापन झालेल्या भाजपाला यंदा ४६ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विशेष कार्यक्रम पार पडला.
यावेळी माजी नगराध्यक्ष अँड. वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचा ध्वज फडकावण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांमध्ये पेढे वाटप करण्यात आले आणि शहरात बाईक रॅली काढून स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर, नगरसेविका सौ. स्वप्नाली राकेश चव्हाण, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, वैजेश सागवेकर, पांडुरंग पाष्टे, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष नईम चौगुले, सौ. प्रीती चिखले, भरत कार्ले, मृत्युंजय मोडक, राहुल प्रभु, विजय पवार, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, विजय गुप्ता, प्रदीप भोसले, प्रशांत बारटक्के आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थापना दिनानिमित्त “माझा परिवार, भाजपा परिवार” हा संदेश देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.