गौरव पोंक्षे माखजन:
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य चे संस्थापक श्री निलेश सांबरे यांचे मार्फत सावर्डे नजीक असुर्डे,मांडकी गावातील जिल्हा परिषदेच्या विविध गावांमधील शाळांमध्ये वह्या वाटप झाले.
यावेळी जिजाऊ संस्थेचे कार्यकर्ते स्वरूप सावंत व जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ शिक्षक संकेश गायकवाड उपस्थित होते.
यामध्ये असुर्डे नं १,असुर्डे बने वाडी,असुर्डे निर्मळ वाडी,असुर्डे बौद्धवाडी,असुर्डे खाजगी प्राथमिक शाळा,मांडकी नं ३ घाणेकरवाडी शाळा,मांडकी खुर्द शाळा, ढोक्रवली शाळा,आदी शाळांमध्ये वह्या वाटप झाले.
यावेळी शिक्षक दीपक भंडारी,वैदेही नलावडे,मनोहर तांबे,सौ कसबेकर,प्रदीप कदम,राजेश पवार,संचिता सावर्डेकर,आदिंसह अनंत घाणेकर,तेजस घाणेकर,नारायण घाणेकर ,शिक्षण तज्ञ,शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.












