खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील चिंचघर- वेताळवाडी येथील दवबिंदू फार्महाऊसमध्ये वेश्या व्यवसाय केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका प्रौढासह महिलेस न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
रवींद्र गणपत गावडे या प्रौढासह एका महिलेने आर्थिक अडचणीत असलेल्या मुलींशी ओळख करून घेत त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते. या पिडीत मुलींना वेश्यागमनासाठी फार्महाऊसवरच ठेवल्याची माहिती मिळताच येथील पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी संपल्याने पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ‘त्या’ दोन पिडीत मुलींना रत्नागिरी येथील महिला सुरक्षागृहात पाठवण्यात आले आहे.









