हेवाळे बांबडेत बसला अपघात सुदैवाने जिवीत हानी नाहीं बसचे नुकासान

दोडामार्ग | सुहास देसाई : तिलारी ते विजघर रस्त्यावरील काही ठिकाणी साईड पट्टी धोकादायक बनली असून आज सकाळी बांबर्डे येथे सकाळी १०:३० च्या दरम्यान वीजघर दोडामार्ग व सावंतवाडी बेळगाव या दोन बस मध्ये अपघात घडला .पण या अपघातात सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसल्याचे समजते
.
विजघरहुन् दोडामार्गच्या दिशने येणारी बस व सावंतवाडीहुन बेळगावच्या दिशने जाणारी बस या दोन्ही बसमधे अवघड वळणावर एकमेकांना बाजू देत असताना चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला . या अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली..परंतु सुदैवानाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही बस रस्ता सोडून झाडीत गेल्याने .उशिरा पर्यंत त्या ठिकाणीच होत्या. याबाबत अधिक तपास सुरू आहे