आचरा-अर्जुन बापर्डेकर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवार दि 14 एप्रिल रोजी न्यू इंग्लिश स्कूल आचरा सभागृहात साजरी केली जाणार आहे . जयंती निमित्त सकाळी ठीक 9 वाजता प्रा श्री नितीन साबाजी बांबर्डेकर, बॅ . नाथ पै शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कुडाळ यांचे ,”डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची प्रासंगिकता “या विषया वर व्याख्यान आयोजित केले आहे त्यांचे सखोल अभ्यास पूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्थानिक स्कूल कमिटिचे अध्यक्ष श्री जे .एम .फर्नांडिस सर भूषवणार आहेत स्थानिक कमिटी सदस्य या कार्यक्रमात उपस्थिती असणार आहेत आचरा गावातील नागरिक व विद्यार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक श्री अंकूश घुटकडे यांनी केले आहे













